माझे कुटुंब, माझी जबाबदारी, आरोग्य सेवा आपुल्या दारी
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
कोरोनामुक्त महाराष्ट्र हेच आमुचे ध्येय
मीच माझ्या आरोग्याचा शिल्पकार
आली आली पहा, कोरोनाची लाट |
जनजीवन अन आरोग्याची, लागलीया वाट ||
सरकारी प्रयत्नांना, साथ देऊ सारे |
सामाजिक अंतराचे, नियम पाळू सगळे ||
मास्क वापरा सदैव, कंटाळा कशाला |
संसर्ग रोखायला, आडकाठी कशाला ||
लक्षणे दिसता, उपचारांची कास धरा |
अंगावर काढून, लपवू नका आजारा ||
कोरोनाचा संसर्ग, वाढू वाढू लागलाय |
मृतांचा आकडाही, वाढतच चाललाय ||
घरोघरी आरोग्य सर्वेक्षण, मोहीम आली सरकारी |
ध्यानात घ्या, माझे कुटुंब माझीच जबाबदारी ||
सरकारी सेवा येणार, आपल्या प्रत्येकाच्या दाराला |
तुमची साथ मोलाची, या सरकारी मोहिमेला ||
योग्य माहिती दिली पाहीजे, आरोग्य पथकाला |
लक्षणे दिसता उपचार घ्या, दडवू नका आजाराला ||
सर्दी, खोकला, ताप, अन कणकण वाटता |
उठा त्वरित जवळचा, सरकारी दवाखाना गाठा ||
आपणच होऊ आपल्या, आरोग्याचे शिल्पकार |
कोरोनाला करायचे आता, महाराष्ट्रातून हद्दपार ||
वैभव मोहन पाटील
- Get link
- X
- Other Apps



Very nice vaibhavji. Liked it.
ReplyDeleteखुपच छान कविता आहे
ReplyDeleteNice link Vaibhavjee
ReplyDeleteVery nice work
ReplyDeleteVery nice poem
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteVery nice poem
ReplyDeletevery nice
ReplyDeleteछान अथँपू्णंँ कविता 😀😀🙏
ReplyDeleteवैभव सर कवितेच्या माध्यमातून आपण कोरोना आजाराबाबत फार छान जनजागृती केली आहे. अभिनंदन
ReplyDeleteखूपच छान कविता सर यू r always great
ReplyDeleteGood
ReplyDeleteVery nice work.
ReplyDeleteHach amcha Devgharcha Vaibhav
Mast
ReplyDeleteM
ReplyDelete